Skip to main content

हाऊ टू थिंक लाईक स्टीव्ह जॉब्स - डॅनियल स्मिथ

 



स्टीव्ह जॉब्स हे केवळ यशस्वी बिझनेसमन नव्हते, तर जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टीही विलक्षण होती. "How to Think Like Steve Jobs" या पुस्तकात डॅनियल स्मिथ यांनी स्टिव्ह जॉब्सला मोजक्या पण इफेक्टिव्ह पद्धतीने लोकांसमोर आणलं आहे. हे पुस्तक जॉब्सच्या आयुष्यातील अनुभव, निर्णय, अपयश आणि यश यांमधून शिकण्यासारखे धडे समोर आणते.

जॉब्स यांचा विश्वास होता की खऱ्या अर्थाने नावीन्य हे टेकनॉलॉजी आणि क्रिएटिव्हिटी यांच्या कॉम्बिनेशनमधून जन्माला येते. त्यांनी नेहमीच वेगळा विचार करण्यास, मोठी स्वप्ने पाहण्यास आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्यास प्रोत्साहन दिले. ग्राहकांना काय हवे आहे हे विचारण्यापेक्षा त्यांना भविष्यात काय आवश्यक वाटेल याचा अंदाज घेण्याची त्यांची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवत होती. या पुस्तकात एक मस्त वाक्य आहे, "अलेक्झांडर ग्रॅहम बेलनं टेलिफोनचा शोध लावण्याआधी मार्केट रिसर्च केला होता ?"

जो मुख्य मुद्दा या पुस्तकात मांडला आहे तो म्हणजे यश हे केवळ टॅलेंट किंवा लक मुळे मिळत नाही. क्लिअर व्हिजन, डेडिकेटेड एफर्टस, डिटेलिंग आणि आपल्या कामाबद्दल असलेली क्युरिऑसिटी यामुळेच अल्टिमेट परिणाम साधता येतात. अपयश आले तरी त्यातून शिकून पुढे जाणे आणि स्वतःच्या कल्पनांवर विश्वास ठेवणे हेच स्टीव्ह जॉब्स यांच्या विचारसरणीचे सार आहे.

हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे. ते आपल्याला आठवण करून देते की जग बदलणाऱ्या कल्पना नेहमीच वेगळा विचार करणाऱ्या लोकांकडून येतात.

"तुमचा वेळ मर्यादित आहे, त्यामुळे दुसऱ्यांचे आयुष्य जगण्यात तो वाया घालवू नका. स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा, धाडसाने निर्णय घ्या आणि उत्कृष्टतेचा पाठपुरावा कधीही थांबवू नका."

- सुबोध अनंत मेस्त्री

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  ...